लोणावळा : रायगड माझा वृत्त
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा संघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. लोणावळा, खंडाळा, कार्ला परिसरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा संघाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आलाय.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी कार्लाफाटा इथे एक्सप्रेसवे अर्धा तास रोखून धरला. त्यामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

शेयर करा