आरक्षणापेक्षा विकास महत्त्वाचा – नितीन गडकरी

नागपूर : रायगड माझा वृत्त

समाजाचे प्रश्‍न लक्षात घेऊन विकासाची दिशा आपल्यालाच ठरवावी लागते. अनेक क्षेत्रांमध्ये विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी समाजात उद्यमशीलता रुजणे आवश्‍यक आहे. मराठ्यांनी आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा विकासाचे व्हिजन ठरवावे, नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा समाज कृती समिती आणि नागपूर शहर मराठा महासंघातर्फे नागपुरात ‘मराठा जागर अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार अध्यक्षस्थानी होते.

ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याच्या बळावर विकास पादाक्रांत केला जाऊ शकतो. समाजाच्या विकासाचे व्हिजन निश्‍चित करावे. ते पूर्ण करण्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही गडकरी यांनी या वेळी दिली. नरेंद्र पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या अवस्थेकडे लक्ष वेधत त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचा विश्‍वास दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत