आरक्षणावरून महाराष्ट्र पेटला असताना छत्रपतींचे वंशज उदयनराजे मात्र गायब!

सातारा : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला असताना, तसेच साताऱ्यातील परिस्थिती काही काळासाठी कां होईना नियंत्रणाबाहेर गेली असताना छत्रपतींचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले कुठे आहेत, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

आरक्षणावरून महाराष्ट्र पेटला असताना छत्रपतींचे वंशज उदयनराजे मात्र गायब!

उदयनराजे हे मराठा समाजावर सर्वाधिक प्रभाव असणार नेते आहेत. आरक्षणासाठी बलिदान झालेतरी यासंबंधाने ते काही बोललेले नाहीत. सरकारने कितीही आवाहन केलेतरी संतप्त कार्यकर्ते शांत व्हायला तयार नाहीत. यापार्श्‍वभूमीवर विषयात उदयनराजेंची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत आहे.

साताऱ्यात आज मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनात सरपंचापासून खासदारांपर्यंत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन समन्वय समितीने केली होते. त्यानुसार प्रत्यक्ष मोर्चात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे सहभागी झाले होते. तसेच ठिय्या आंदोलनात आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित होते. पण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले मात्र उपस्थित राहिले नाहीत. मोर्चात त्यांचे समर्थक मात्र त्यांच्या नावाच्या घोषणा देत सहभागी झाले होते.

नेमके उदयनराजे होते कुठे, याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून घेतला, त्यावेळी ते पुण्यातच असल्याचे सांगण्यात आले. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत