आरक्षणासाठी बीडमध्ये आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : रायगड माझा वृत्त 

मराठा समाजाला आरक्षण द्यावे एवढीच अंतिम इच्छा’ असल्याचे चिट्ठीत नमूद करून पिंपळनेर येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. शिवाजी तुकाराम काटे (वय ४२ वर्ष) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.

मयत शेतकरी शिवाजी काटे हे मुळचे पिंपळनेर (ता. बीड) येथील रहिवासी होते. कामानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून जवळच असलेल्या बेडूकवाडी शिवारातील शेतवस्तीवर ते वास्तव्यास होते. शुक्रवारी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर सकाळी त्यांच्या शर्टच्या खिशात चिट्ठी आढळून आली असून, त्यामध्ये मराठा समाजासाठी आज दि. ३ रोजी मी माझे जीवन संपवीत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण द्यावे एवढीच विनंती. असे म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.