आरक्षण असतानाही प्रवाशांना गाडीत घेण्यास वाहकाचा नकार!

म्हसळा : निकेश कोकचा 

मुंबई येथे जाण्यासाठी आरक्षण करून वेळेत स्थानकावर उभे राहून चालकाने गाडी थांबविली मात्र वाहकांने आरक्षण तिकीटाची शहानिशा न करता ही तुमची गाडी नाही मागून गाडी येत आहे असे सांगून गाडीत प्रवाशांना घेण्यास नकार देऊन श्रीवर्धन आगाराचा भोंगळपणा दाखवून दिला आहे.
याबाबतचे सावितर वृत्त असे की, मौजे सरवर ता . म्हसळा येथील सौं विदया विजय मोहीते यांनी दिनांक २ जून  रोजी . सकाळी देवघर येथे येणाऱ्या श्रीवर्धन शेखाडी बोली मुंबई या एस  टी चे देवघर ते मुंबई असे आरक्षण केले होते सदर आरक्षण तिकीटावर बसण्याचे ठिकाण देवघर असे स्पष्टपणे उल्लेख आहे सदरची गाडी देवघर स्थानकावर सकाळी07.35 वाजता आली असता प्रवासी सौ मोहीते यांनी गाडी थांबविणेसाठी हात दाखविला असता चालकाने गाडी थांबविली म्हणून सौ मोहीते यांनी आमचे आरक्षण आहे असे सांगितले मात्र वाहकाने आरक्षण न पाहता तुमची ही गाडी नाही मागून येत आहे त्या गाडीने या असे सांगितले मात्र बराच वेळ झाला म्हणून म्हसळा स्थानकात फोनद्वारे चौकशी केली असता गाडी वेळेवर गेली असल्याचे सांगितले.
त्यानंतर सौ मोहीते म्हसळा येथे रिक्षाने गेल्या आणि त्यांना श्रीवर्धन . दिवेआगर मुंबई या गाडीने सकाळी ९ वाजता म्हसळा स्थानक प्रमुख श्री वासकर यांनी पाठविण्याची व्यवस्था केलीं मात्र संबधीत गाडीच्या वाहकाने स्वतःकडे असणाऱ्या लॉकशी ट ची खातरजमा न करता प्रवाशांना आरक्षण असतांनाही गाडीत का घेतले नाही याचा खुलासा आगारप्रमुख श्रीवर्धन यांनी खुलासा करावा व या बेजबाबदार वाहकावर कडक कारवाई करावी अशी मागणी सौ मोहीते यांनी विभाग नियंत्रक रायगड यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
 
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत