आरे कॉलनी आगीची सीआयडी चौकशीची शिवसेनेकडून मागणी

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबई शहरात आणि उपनगरात सातत्याने आगीच्या घटना घडत असताना सोमवार दि. 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6च्या सुमारास गोरेगाव (पू.) येथील आरे कॉलनीतील डोंगरावरील जंगलाला भीषण आग लागली. वृक्ष व सुक्या गवताने पेट घेतल्याने आगीचा भडका 3 ते 4 कि. मी.पर्यंत भडकला. ही आग लेव्हल-3ची असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या आगीमुळे दुर्मिळ झाडांसह वन्य प्राणी जिवांचीदेखील हानी झाली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे कॉलनीच्या लगत असणाऱ्या खासगी भूखंडावर आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे ही आग नैसर्गिकरीत्या लागून वणवा भडकला की स्थानिक जमीन मालकांद्वारे समाज कंटकांमार्फत जाणूनबूजून सुके गवत पेटवून आग लावण्यात आली. याबाबत स्थानिक नागरिक आणि वनप्रेमींच्या मनात संशय आहे. यामुळे आग नक्की नैसर्गिकरीत्या लागली की लावली गेली या प्रकरणाची चौकशी, सी.आय.डी.मार्फत करा, अशी मागणी पत्राद्वारे करून आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत