आरोग्य सेविकेच्या विनयभंग प्रकरणी माहिला तक्रार निवारण समितीपुढे चौकशी

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील आरोग्य सेविकेचा एका शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी शिक्षण विभागाने तब्बल २० दिवसानंतर आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी तालुकास्तरीय महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करुण पिडीत महिला कर्मचारी साहित इतर प्रत्यक्षदर्शीना उपस्थित राहण्यासाठी नोटिस काढली आहे. शनिवार दि २९ सप्टेंबर रोजी महिला तक्रार निवारण समिती पुढे पिडित महिलेला आपले म्हणणे मांडायचे आहे.

रायगड जिल्हा परिषदेची शाळा ताम्हाणे करंबे येथे विद्यार्थ्याच्या नोंदीबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य खात्यातील आरोग्य सेविकेला तेथील शिक्षक कमलाकर ज्ञानदेव धुळगुंडे यांनी तीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे शब्द वापरले व त्याप्रमाणे वागणूकही केली. या बाबत पिडीत आरोग्य सेविकेने म्हसळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र लेखी तक्रार करूण विस दिवस उलटल्या नंतरही अद्याप कारवाई झाली नसल्याने शिक्षण विभागातील इतर शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. कारवाई करण्यासाठी विलंब होत असल्याने पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाकडून सदर प्रकरण बारगळवण्याचा प्रयत्न होत असल्याची टिका देखील होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत