आर्थिक परिस्थितीला कंटाळून वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या

माणगाव : रायगड माझा वृत्त 

माणगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये राहणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक तर सलग दोन वेळा राज्यस्तरीय गोल्ड मेडल पटकावणाऱ्या वेटलिफ्टर वैभवी पाटेकर या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक परिस्थितीला कंटाळून गोरेगावमधील विष्णू तलावात वैभवीने जीवन संपवले. वैभवीने केलेली आत्महत्या संपूर्ण क्रिडा जगताला चटका लावणारी आहे.

 

वैभवी गोरेगांव कॉलेजची विद्यार्थिनी होती. दाबेलीची गाडी चालवून आपला संसार चालवणाऱ्या ज्योतिका पाटेकर आणि त्यांची मुलगी वैभवी पाटेकर या मायलेकींनी मागच्या वर्षी राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली होती.

आर्थिक परिस्थितीला कंटाळून वैभवीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून वैभवी बेपत्ता होती. तेव्हापासून तिचा शोध सुरु होता. अखेर गोरेगाव येथील तलावात तिचा मृतदेह आढळला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत