आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा सतेज पाटील यांचा नवी मुंबईत इशारा 

नवी मुंबई : अमोल कांबळे

 नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नवीमुंबई महापालिकेत बैठक घेतली. यावेळी शहरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत महानगरपालिका आयुक्तांना सूचना केल्या.

कोरोना रुग्णाच्या चाचणीचा अहवाल लवकरात लवकर यावा याकरिता संपूर्ण नवीमुंबई मध्ये अँटीजन बॉडी टेस्ट सेंटर वाढवण्याच्या सूचना देखील महानगरपालिकेला केल्या.  कोरोना काळात शहरातील खाजगी डॉक्टरांनी रुग्णांच्या केलेल्या आर्थिक लुटी बद्दल वर भाष्य करत यावर अश्या डॉक्टरांवर व हॉस्पिटल वर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन स्पष्ट केले.

शहरात असलेल्या APMC मार्केट मध्ये दिवसेंदिवस सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवला जात आहे व मास्क चे पण वापर करणे टाळले जातात त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी APMC चे सचिव यांच्या सोबत बैठक घेऊन उपाय काढण्यात येणार असल्याचे  त्यांनी सूतोवाच केले.

नवी मुंबईत कोरोनाला रोखण्याचे प्रशासनाचे सर्वस्तरावर प्रयत्न सुरु आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यायची नवी मुंबई भेट या त्या प्रयत्नांचाच भाग असून याला कितपत यश येते हे पहाणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत