आर.के.इन्टरप्रायझेस आयोजित मोफत आरोग्य शिबिराला कोलाडात उत्स्फूर्त प्रतिसाद

( कोलाड : कल्पेश पवार )

रोहे तालुक्यातील कोलाड आंबेवाडी प्राथमिक शाळेत रविवारी दि 21 जाने,रोजी , डाॅ.आर.एन.पाटील सुरज हाॅस्पिटल सानपाडा ,रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान , तसेच आर.के.इन्टरप्रायझेस राकेश काशिराम लोखंडे यांचा संयुक्त विद्यामानाने विविध आजारावर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या आरोग्य शिबिराचा मोठया प्रमाणात रुग्णानी लाभ घेतला .

या शिबाराच्या उद्घाटन प्रसंगी , उद्घाटक प्रमुख श्रीमंती सुनिता काशिराम लोखंडे.तसेच सौ.चेतना चंद्रकात लोखंडे (पं.स.सदस्या), महादेव करे-( रोहा कृषिअधिकारी,) अशोक महामुनी ,विजय पाटील ( सरपंच ) चंद्रकांत लोखंडे,( उपतालुका प्रमुख शिवसेना ) अरविंद मगर, ( उपसरपंच,वाशी ) ,मारुती लोखंडे जेस्ट नेते , रामचंद्र म्हात्रे ( अध्यक्ष रोहा शेतकरी प्रतिष्ठान,)रोहिदास सानप,शेती उदोजक,नंदू मरवडे ,श्री एस एस मरवडे ,तुकाराम सानप ,सुनील दळवी,आयोजक राकेश लोखंडे व सौ. लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते .

या शिबिरात मेदूचे आजार , मणक्याचे आजार ,माणसिक विकार ,हृदयविकार ,आॅथोपेडीक,आॅडियोमेट्री आदी रोगावर तज्ञ डाॅक्टर ,डाॅ.आर.एन.पाटील (मेंदू व मणका विकार तज्ञ), डाॅ.उदय पाटील (हृदय विकार तज्ञ) यांनी रुग्णांची योग्य ती तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या व औषध दिल्या या शिबिरात एकूण जवळपास 300 गरजू रुग्णांनी लाभ घेतला .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत