आलिबाग येथे पोलीस कल्याण सप्ताहाचे आयोजन!

पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी साधला संवाद

अलिबाग : रायगड माझा वृत्त 

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात राबविण्यात येणा-या पोलीस कल्याण योजनेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये पोलीस कल्याण सप्ताहाचे आलिबाग येथे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी रायगड जिल्हा पोलीस आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांच्या अडी अडचणी जाणून त्यांनी त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. पुणे येथे CBSE बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरु करणार असून नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यासाठी होस्टेल उभारणार असल्याचे सांगितले. यावेळी तसेच पोलीसअधिकारी, कर्मचारी यांच्या मुलांचे गुणगौरव करण्यात आले.

पोलीस कर्मचारी यांचे कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलतीच्या सहलीला मा.पोलीस महासंचालक श्री.सतीश माथुर यांनी हिरवा झेंडा दाखऊन रवाना करण्यात आले. तसेच त्यांचे हस्ते पेट्रोलपंपाचे आणि पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबविलेल्या योजना आणि उपक्रमासंदर्भातील पुस्तिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व पोलीस ठाण्याचे आणि शाखांचे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट रायगड माझा

पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचं केला गुणगौरव

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत