रायगड माझा ऑनलाईन l नवी दिल्ली
भारतीय महिला कुस्तीपटू नवजोत कौर हिने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नवजोतने ६४ किलो वजनी गटात जपानच्या मिया इमाईला ९-१ने नमवत हे पदक पटकावले. नवजोत आणि मिया यांच्यात आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम लढत किर्गिस्तानच्या बिश्केकमध्ये झाली.
याबरोबरच भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी साक्षी मिलिक हिने या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. साक्षीने ६२ किलो फ्रीस्टाइल गटात कझाकिस्तानच्या अयॉलीम केसीमोवाला १०-७ ने हरवले. या दोन पदकांबरोबर या स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या ६ झाली आहे. यात १ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.