आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये सिंधू आणि सायनाने केली ऐतिहासिक कामगिरी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

आशियाई स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींनीही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एशियाडमध्ये बॅडमिंटनच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय ठरली आहे, तर कांस्य पदक मिळवत सायनानेही बॅडमिंटन एकेरीत ३६ वर्षांनी पदक जिंकून इतिहास रचला आहे. बॅडमिंटनच्या एकेरीत पदक मिळवणारी सायना पहिली भारतीय महिला ठरली आहे.

बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सायना नेहवालने कांस्य पदक पटकावले आहे. ती बॅडमिंटनमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. उपांत्य फेरीत हरली तरी सायनाने एकेरीत ३६ वर्षांनी पदक आणत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुसरीकडे सिंधूनेही बॅडमिंटन एकेरीच्या अंतिम फेरीत मजल मारत इतिहास रचला आहे. आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनच्या महिला एकेरीत अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी सिंधु पहिली भारतीय आहे.

पी.व्ही. सिंधूने जपानच्या यामागुचीचा २१-१७, १५,२१, २१-१० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. परिणामी बॅडमिंटनमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. पण सिंधूकडून देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

चीनी ताइपेच्या ताइ जू यिंगने सायनाचा उपांत्य फेरीत पराभव केला आणि सुवर्णपदकाचं सायनाचं स्वप्न भंगलं. पण आशियाई स्पर्धांमध्ये ३६ वर्षांनंतर पहिल्यांदा बॅडमिंटन महिला एकेरीत भारताला तिनं पदक मिळवून दिलं आहे. यापूर्वी १९८२ मध्ये सय्यद मोदीला एकेरीत कांस्य पदक मिळालं होतं. सायना आणि यिंगमध्ये यापूर्वी १६ सामने झाले आहेत, त्यापैकी सायना ५ तर यिंग ११ जिंकली आहे. आता अंतिम फेरीत सिंधू कशी कामगिरी करते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत