आशिया चषकावर मॅच फिक्सिंगचे सावट; आठ क्रिकेटर ICC च्या रडारवर

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

संयुक्त अरब अमिरातमध्ये सध्या आशिया चषकाची धामधूम सुरु आहे. त्याचवेळी क्रिकेट विश्वातील सर्वांनाच धक्का देणारी माहिती समोर आलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या अँटी-करप्शन यूनिटच्या एका अहवालामध्ये मॅच फिक्सिंगमध्ये काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आणि कर्णधारांच्या समावेशाची शंका व्यक्त केलीय.

अँटी-करप्शन युनिटने आपल्या अहवालात म्हटलंय की, “सर्वाधिक भारतीय बुकी मॅच फिक्सिंगसारख्या प्रकरणात समाविष्ट आहेत. भारतीय बुकींनी मॅच फिक्सिंगचं हे जाळं इतकं वाढवलंय की, त्यांना पकडण्यास आयसीसीलाही मोठ्या अडचणींना सामोर जावं लागत आहे.”एकूण आठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटर मॅच फिक्सिंगमध्ये समाविष्ट असण्याची शक्यता आहे. या आठ क्रिकेटरमधील पाच जण कर्णधार आहेत, असे अँटी-करप्शन युनिटच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगण्यात आले. एकंदरीत मॅच फिक्सिंगचं हे प्रकरण आयसीसीला मोठी डोकेदुखी ठरली आहे.

अँटी-करप्शन युनिटच्या सिक्युरिटी युनिटचे जनरल मॅनेजर अॅलेक्स मार्शल यांनी ‘या’ आठ संशयित क्रिकेटरबद्दल स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. मात्र, जे क्रिकेटर मॅच फिक्सिंगमध्ये समाविष्ट आहेत, ते आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्य देशांच्या संघातील आहेत, असे अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले. बुकीच्या निशाण्यावर टीमचे कर्णधार असतात, असे अँटी-करप्शन युनिटने सांगितले. कारण कुठलाही कर्णधार सहजपणे बुकीला हवे तसे, फिल्डिंग, गोलंदाजी आणि प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल खरु शकतो.

“मॅच फिक्सिंगसारखे प्रकार क्रिकेटमध्ये आता राहिले नाहीत, याबद्दल आम्ही निश्चिंत आहोत. मात्र बुकी आता दुसऱ्या पद्धतीन क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार पसरवत आहेत. स्पॉट फिक्सिंगसारख्या घटनांमधून बुकी फिक्सिंग करत आहेत.”, असे अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले.

गेल्या एका वर्षात आयसीसीने फिक्सिंगच्या 32 प्रकरणांची चौकशी केली, ज्यात पाच प्रशासकीय अधिकारीही सहभागी होते, अशी माहिती अँटी-करप्शन युनिटने दिली. यात 23 अशी प्रकरणं समोर आली, ज्यात बुकींनी थेट क्रिकेटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या त्या वेळी क्रिकेटरने तातडीने यासंदर्भातील माहिती टीम मॅनेजमेंट आमि अँटी-करप्शन युनिटला दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत