आशिष शेलार स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरुला रवाना

मुंबई: रायगड माझा

 कर्नाटक विधानसभेत आज भाजपची कसोटी पार पडणार असल्याचे दिसत आहे. आज दुपारी 4 वा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी दिलेली 15 दिवसांची मुदत अमान्य करत, आज दुपारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.

कर्नाटकात आज सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्याला ‘ऑपरेशन कमळ’ असे नाव दिले आहे. या स्पेशल ऑपरेशन टीममध्ये पक्ष श्रेष्टींकडून महाराष्ट्रातून आमदार आशिष शेलार यांना पाचारण करण्यात आले आहे. सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी आशिष शेलार आज सकाळी बंगळुरूच्या दिशेने स्पेशल चार्टर्ड विमानाने रवाना झाले आहेत.

कर्नाटक निवडणुकीत आशिष शेलार यांच्याकडे 47 मतदारसंघाची जबाबदरी होती. बंगळुरु ग्रामीण आणि शहर या भागात आशिष शेलार निवडणूक काळात तळ ठोकून होते. त्यामुळे कर्नाटकच्या लढाईसाठी भाजपने महाराष्ट्रातून कुमक पाठवली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत