आषाढीनिमित्त कर्जतमधून वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान

कर्जत: भूषण प्रधान 

भजनसम्राट गजानन बुवा पाटील यांची वारकरी सांप्रदायाची परंपरा पुढे नेण्यासाठी आज कर्जतमध्ये स्वर्गीय गजाजन बुवांचे चिरंजीव प्रसादबुवा पाटील यांच्या पुढाकाराने कर्जत ते पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले.

कर्जत तालुक्याला स्वर्गीय गजानन बुवा पाटील यांच्या बहुजनांची परंपरा लाभली आहे. त्यांच्या अध्यात्माचा हा वारसा भजन मंडळाच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. याचाच भाग म्हणून आषाढी एकादशीचे औचित्य साधून कर्जत ते पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ताल मृदूंगाच्या गजरात वारी काढण्यात आली. पुढील वर्षी पायी वारी काढण्याचा संकल्प सोडण्यात आला. कर्जत मधून अनेक वारकरी विठुरायाला भेटायला पंढरपूरला जात असतात मत्यामध्ये या वारीचा समावेश झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत