इंग्लंडचा शानदार विजय, मालिकेवर यजमानांचा 2-1 असा कब्जा

 

रायगड माझा वृत्त 

जो रूटचे शानदार शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनसोबत केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. लीड्समध्ये सुरू असलेल्या वनडे आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडने ही मालिका २- १ ने जिंकली आहे.

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने संयमी खेळी करत इंग्लंडच्या संघाला २५७ धावांचे आव्हान दिले. इंग्लंडने मात्र अवघ्या ४४.३ षटकांत २ बाद २६० धावा करत भारतावर सहज विजय मिळवला. जो रुटने नाबाद १०० तर कर्णधार इयॉन मॉर्गनने नाबाद ८८ धावांची खेळी केली. रुट आणि मॉर्गन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी केली.

दरम्यान, याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहलीनं कर्णधार म्हणून ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्सला मागे टाकले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत