इंग्लंडमध्ये उपचार घेत असलेल्या इरफानला शाहरुखची मदत

 

मुंबई : रायगड माझा 

लंडनमध्ये दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या इरफान खानला शाहरुखने मदतीचा हात दिला आहे. लंडनमधील आपल्या घराची चावी देत शाहरुखने आपल्या मित्राला छोटीशी मदत केली आहे.

उपचारासाठी लंडनला जाण्याअगोदर इरफानने शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शाहरुखने इरफानच्या घरी जात त्याची भेट घेतली. तेव्हाच शाहरुखने आपल्या लंडनमध्ये असलेल्या घराची चावी इरफान खानला दिली असल्याचे समजते. इरफान आणि त्याचे कुटुंब घरच्या वातावरणात राहू शकेल, या त्यामागचा उद्देश होता.

शाहरुख आणि इरफान हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बॉलिवूडच्या या दोन्ही सुपरस्टार्सने ‘बिल्लु’ सिनेमात एकत्र कामही केले आहे. दरम्यान, इरफान सध्या न्यूरोएन्डोक्रिन कॅन्सरने ग्रस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने लंडनमधील काही फोटो शेअर केले. तसेच इरफानने एक भावनिक पत्रही लिहिले आहे. या संवेदनशील पत्रातून इरफान मानसिकदृष्ट्या खचल्याचे  दिसत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.