इंग्लंडला घरी पाठवून क्रोएशिया प्रथमच फिफाच्या अंतिम फेरीत

रायगड माझा वृत्त 

बुधवारी इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यामध्ये फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात झालेल्या लढतील क्रोएशियाने इतिहास घडविताना इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. मारिया मानजुकीच याने अतिरिक्त वेळात केलेल्या गोलमुळे क्रोएशिया हि कामगिरी करू शकला. क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असे हरविले. आता त्यांचा अंतिम मुकाबला १९९८ च्या विश्वचषक विजेत्या फ्रांसबरोबर १५ जुलै रोजी होणार आहे.

सामना सुरु झाला तेव्हा इंग्लंडच्या किरेन ट्रीपीयरने पाचव्या मिनिटाला पहिला गोल केला आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. फ्री किकवर हा गोल केला गेला मात्र ६८ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या इवान पेरीसीचने गोल नोंदवून बरोबरी केली. त्यानंतर मात्र कुणालाच गोल न करता आल्याने अतिरिक्त वेळ दैल गेला त्यात १०९ व्या मिनिटाला मानजुकीचने गोल करून क्रोएशियाला विजय मिळवून दिला.

या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासाठी बेल्जियम बरोबर इंग्लंडची लढत होणार असून हा सामना १४ जुलैला होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत