इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

सांगली : रायगड माझा वृत्त 

Image result for suicide
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षता कोष्टी असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

अक्षता कोष्टी ही वालचंद महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अक्षताने महाविद्यालयाच्या आवारातील वसतिगृहात आपल्या रुममध्ये पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अक्षता ही मूळची जत तालुक्यातील डफळापूरची रहिवासी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत