इंडोनशिया : उड्डाण घेतल्यानंतर १३ मिनीटात विमान समुद्रात कोसळले

जकार्ता (इंडोनेशिया) : रायगड माझा ऑनलाईन

Image result for lion airlines

इंडोनेशियामधील लॉयन एअरलाईन्सचे पँसेंजर विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १३ मिनीटात समुद्रात कोसळले. इंडोनेशियाच्या शोध आणि बचाव संस्थेने या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. हे विमान २१० प्रवाशांसह जकार्ताहून सुमात्रा बेटावरील पांगकल पिनाग  या शहराकडे जात असताना  हा अपघात झाला. हे विमान समुद्रात कोसळल्याचे लॉयन एअरलाईन्सचे प्रवक्ते युसुफ लतिफ यांनी सांगितले.

बोईंग ७३७ एमएएक्स ८ या या विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १३ मिनीटात संपर्क तुटल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले. विमानामध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या क्षणी आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे लायन एअर ग्रुपचे मुख्य कार्यकारी एडवर्ड सिरैट यांनी सांगितले. आम्ही सर्व माहिती आणि डेटा जमवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

लायन एअर ही इंडोनेशियाची उदयोन्मुख आणि मोठी एअरलाईन्स आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी ही एअरलाईन्स सेवा देते. २०१३ मध्ये सुध्दा या एअरलाईन्सच्या विमानाला अपघात झाला होता पण सुदैवाने जीवीतहानी झाली नव्हती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत