इंदापूर तालुक्यात अनधिकृत पाणी विक्री जोरात

इंदापूर : विजय शिंदे

पावसाला जोरदार सुरवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सर्वच ठिकाणी गढूळ स्वरुपात पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिक शुद्धीकरण केलेले पाणी विकत घेणे पसंत करतात. अशातच इंदापूर तालुक्यामध्ये जारच्या नावाखाली अनधिकृत पाणी विक्री केली जातेय. त्या पाण्याची कोणत्याही प्रकारची प्रयोगशाळेतुन तपासणी केली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेय. या पाण्याची कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नसल्याने ते पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे दिसत आहे. तसेच पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या जारला कोणतेही सील नसल्याने त्यामध्ये घातक पदार्थांचे मिश्रण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही ठिकाणी जागेची अस्वच्छता, जार धुतले जात नाहीत, प्रयोगशाळेतुन पाण्याची तपासणी केली जात नाही, पाण्यावर शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. या सर्व गोष्टींवर कोणाचंही नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे. अनधिकृत पाणी विक्री करत पैसे कमवण्याच्या स्पर्धेमुळे प्रामाणिकपणे पाणी विक्री करणाऱ्या जार विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे याकडे प्रशासन काय कारवाई करतंय हे पाहणे महत्त्वाचे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत