इगतपुरीजवळ रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे ची वाहतूक विस्कळीत

नाशिक: रायगड माझा वृत्त 

सध्या रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार वाढत चालेत . काही दिवसांपूर्वीच कसारा आणि इगतपुरी घाट सेक्शनच्या दरम्यान गोरखपूर एक्स्प्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी फलाट क्रमांक ३ वरील रुळाला तडा गेल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती.

 

रेल्वे रुळाच्या दुरुस्तीला दोन ते अडीच तास लागणार असल्यानं वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली. त्यामुळं रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे एक्स्प्रेस उशिरानं धावत आहेत.  या घटनेमुळं प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यात आज पुन्हा मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. इगतपुरी स्थानकाजवळ फलाट क्रमांक तीनवरील रुळाला तडा गेल्याचं लक्षात येताच, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली. त्यामुळं वाहतूक विलंबानं सुरू आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, रूळ दुरुस्तीला दोन ते अडीच तास लागण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी, पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस विलंबानं धावत आहेत. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत