इचलकरंजीत कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड

इचलकरंजी : रायगड माझा वृत्त 

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून मायलेकींचा खून झाला आहे. अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. कुटुंबातल्या जावयाने केलेल्या हल्ल्यात त्याच्या सासू व मेहुणीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व मेहुणा गंभीर जखमी आहेत. त्यांना सांगली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार उपचार सुरू आहेत.

छाया श्रीपती धुमाळ – आयरेकर व सोनाली अभिजित रावण अशी मृतांची नावे आहेत तर रोहित श्रीपती धुमाळ व रुपाली धुमाळ अशी जखमींची नावे आहेत. यड्राव येथील शिरगावे मळ्यात ही घटना शनिवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली. हल्लेखोर प्रदीप विश्वनाथ जगताप ( मूळ राहणार कवठेगुलंद जि. सांगली ) हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना झाली होती. तो प्रदीप पोलीसांच्या हाती लागल्याचे समजते. त्याने यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने घाव घालून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन झाले आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत