इन्स्टाग्रामवर नवं फीचर, अश्लील फोटो ब्लर ठेवणार!

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for instagram pics

इन्स्टाग्रामने एक नवं फीचर आणलं आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या फीचरचं नाव आहे. इन्स्टाग्रामनं नुकतच हे फीचर लाँच केलं असून या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडिओ, थंबनेल्स क्लिक करेंपर्यंत ब्लर दिसतील. युजरने क्लिक केल्यानंतर मात्र ते स्पष्टपणे दिसतील. अश्लील, वादग्रस्त कमेंट्सला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामनं हे पाऊल उचललं आहे.

वोग डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर आहे. इन्स्टाग्रामवर अनेकदा अश्लील फोटो, सर्च, रिकमेंड किंवा सर्च केल्यानंतर अचानक अश्लील फोटो किंवा व्हिडिओ नजरेसमोर येतो. अल्पवयीन मुला-मुलींना यापासून अलिप्त राहता यावे यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केली होती, असा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांनी केला होता.

सोशल मीडियावर तरुण वर्ग खूप मोठा आहे. यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी हव्या त्या उपाययोजना कराव्यात, असा आदेश इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी सोशल मीडिया कंपन्यांना दिला होता. त्यानंतर इन्स्टाग्राममध्ये हा बदल करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत