इमारतीच्या ६व्या मजल्यावर चढून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे: रायगड माझा वृत्त

ठाणे पश्चिमेकडील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील पोलीस वसाहतीमधील इमारतीच्या सहाव्या मजल्याच्या सज्जावर तरुणी बसली होती. तिनं स्वतःला जखमाही करून घेतल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढून एका तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी ठाण्यात घडली. पोलीस आणि अग्निशमन दलानं वेळीच तरुणीला वाचवल्यानं अनर्थ टळला. तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचं कारण समजू शकलं नाही.  तरुणीनं उडी मारू नये, यासाठी तिला बोलण्यात गुंतवले.

त्याचवेळी एक पोलीस कर्मचारी साध्या वेषात सहाव्या मजल्यावर पोहोचला. त्यानंतर अन्य एका कर्मचाऱ्याच्या मदतीनं त्यांनी तरुणीला वाचवलं. तरुणीचं नाव आणि ती कुठून आली याबाबत माहिती मिळू शकली नाही. तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याची चौकशी ठाणे नगर पोलीस करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत