इमारतीवरचा झगमगाट बंद करून सीएसएमटी स्थानकाने वाहिली अटलजींना आदरांजली!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. वाजपेयींना संपूर्ण देशभरातून श्रद्घांजली देण्यात येतेय. त्याचप्रमाणे मुंबईतही अनेक ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.

नेहमीप्रमाणे झगमगाटाने उजळून निघणारं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस काल (गुरुवारी) रात्री मात्र शांत असलेलं पहायला मिळालं.अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या सीएसएमटीची इमारतीवरचा झगमगाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दररोज प्रकाशाने उजळून निघणारी सीएसएमटीची इमारत काल मात्र शांत असलेली पहायला मिळाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत