ईशा अंबानी लग्नानंतर राहणार ४५२ कोटींच्या बंगल्यात!

मुंबई : रायगड माझा वृत्त

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लग्नानंतर पती आनंद पिरामलसोबत वरळी सी-फेस येथील अलिशान बंगल्यात राहणार आहे. या पाच मजली बंगल्याची किंमत ४५२ कोटी एवढी आहे. सहा वर्षापूर्वी आनंद पिरामल यांचे वडील अजय पिरामल यांनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडकडून या बंगल्याची खरेदी केली होती. वरळी सी-फेसजवळ असलेला हा बंगला ५० हजार स्क्वेअर फूट परिसरात बांधण्यात आला आहे.

 

आनंद आणि ईशा यांना लग्नाची भेट म्हणून हा बंगला देण्यात येणार आहे. त्यासाठी १९ सप्टेंबर रोजीच त्यांनी पालिकेकडून कागदपत्रेही मिळविली आहेत. या पाच मजली बंगल्यात बेसमेंटला ३ मजले वेगळे आहेत. त्यात दुसरा आणि तिसरा मजला सर्व्हिस आणि पार्किंगसाठी आहे. लेव्हल-१ बेसमेंटमध्ये एक लॉन, ओपन एअर वॉटर बॉडी आणि एक डबल हाइट मल्टिपर्पज रूम आहे. ग्राऊंड फ्लोअरला एक प्रवेशद्वार आहे. वरच्या मजल्यावर राहण्याच्या रूम असून डायनिंग हॉल तसेच ट्रिपल हाइट मल्टिपर्पज रूम, बेडरूम आणि स्टडी रूम आहे. या बंगल्याचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यात लाऊंज एरियाही आहे. त्याशिवाय ड्रेसिंग रूम आणि नोकरांसाठी रूमही बनविण्यात आले आहेत.

हा बंगला हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या ट्रेनिंग सेंटरच्या एका प्लॉटवर बांधण्यात आला आहे. पिरामल यांनी २०१२ मध्ये हा बंगला ४५२.५ कोटींना विकत घेतला होता. त्यानंतर या बंगल्यातील बांधकामावरून काही वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद मिटल्याने २०१५ मध्ये या बंगल्याच्या बांधकामास पुन्हा सुरुवात झाली होती.

सध्या हा बंगला बांधून पूर्ण झाला असून इंटिरियर फिनिशिंगचं काम सुरू आहे. १ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. त्याच दिवशी या बंगल्यात पूजा आयोजित करण्यात आली आहे. तर आनंद आणि ईशा यांचा विवाह १२ डिसेंबर रोजी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत