उघड्या रोहित्र (ट्रान्सफर डीपी)मुळे जीवितास धोका:विद्युत कर्मचारी यांचे दुर्लक्ष 

बोर्ली मांडला – अमूलकुमार जैन
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या उघडया रोहित्र (ट्रान्सफर डीपी) मुळे त्या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाले आहे.तरी संबंधित विभागाचे अधिकारी आणि विद्युत मित्र यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुरूड तालुक्यातील काकलघर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे महाळूगे वांदेली या रस्त्यावर निवृत्त शिक्षक सीताराम ठाकूर यांची बागायती जमीन आहे.त्यांच्या या जागेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची रोहित्र (ट्रान्सफर डीपी)बसविलेली आहे.

या डीपीला असणाऱ्या दोन झडपापैकी एक झडप ही गायब झालेली आहे तर दुसरी झडप सुद्धा मोडक्या अवस्थेत आहे.ह्या डीपीमध्ये चार ते पाच विद्युत पुरवठा करणारे कट आऊट आहेत त्यातील एका कट आऊटवर  फ्यूज बसविलेला असतो.तर बाकीच्या कट आऊट वर फ्यूज न बसविता विद्युत पुरवठा केला गेला आहे. बाकीच्या कट आऊटवर फ्यूज न बसविल्यामुळे त्या ठिकाणी काही वेळा वीज चोरीचाही प्रकार घडला जातो अशी माहिती काही ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

या डीपीमधील कट आऊट वर फ्यूज न बसवल्याने तसेच डीपीस झडपा योग्य स्थितीत न बसविल्यामुळे त्या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण  झाला आहे. याबाबत या परिसरातील विद्युत मित्र अनवर यांनी सांगितले की सदरची डीपी ही नादुरुस्त झाली आहे .त्याबद्दल वरिष्ठांना सांगितलेले आहे.
महाळूगे येथील डीपी बाबत तेथील विद्युत मित्र अनवर यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन ती नादुरुस्त डीपी बदलण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून ती पावसाळ्यापूर्वी बदलून टाकू.  -मनोज चव्हाण. कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य वितरण ,बोर्ली-मुरूड.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत