उच्च न्यायालयाकडून नवाज शरीफ आणि कुटुंबीयांची शिक्षा स्थगित

इस्लामाबाद  – इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नवाज शरीफ, त्यांची कन्या मरियम शरीफ आणि जावई कॅप्टन सफदर यांची शिक्षा स्थगित करून त्यांना मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने शरीफ कुटुंबीयांना मोठाच दिलासा मिळालेला आहे. इस्लामाबद उच्च न्यायायाने यापूर्वी हा निर्णय राखून ठेवला होता.

न्यायमूर्ती अतहर मिनाल्लाह आणि न्यायमूर्ती हसन औरंग़जेब यांच्या खंडपीठाने त्यांची मुक्तता केली आहे.
ऍव्हनफील्ड मालमत्ता प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने 6 जुलै 2018 रोजी नवाब शरीफ यांना दहा वर्षे, त्यांची कन्या मरियमला सात वर्षे आणि जावई कॅप्टन सफदर यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून शरीफ रावळपिंडी येथील आदियाला तुरुंगात कैदेत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत