उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली, 45 जणांचा मृत्यू

  • मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • पोलिसांनी आणि एसडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरु केलेलं आहे.

47 Killed After Bus Falls Into Gorge In Uttarakhand's Pauri Garhwal
देहरादून : बस दरीत कोसळून 45 जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरु आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पौडी गढवाल येथील ही घटना असल्याची माहिती आहे. भौण येथून रामनगरला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला, ज्यामध्ये प्रवास करत असेलल्या 45 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जास्त स्थानिक असल्याचीही माहिती आहे. पोलिसांनी आणि एसडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरु केलेलं आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शिवाय मृतांबाबतची माहितीही अद्याप उपलब्ध झालेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत