उत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू

देहरादून : रायगड माझा ऑनलाईन 

उत्तराखंडची राजधानी डेहरादून मध्ये स्वाईन फ्लूने थैमान घातले असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पटेलनगरमधील श्रीमहंत इस्पितळात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. श्रीमहंत इस्पितळात गेल्या तीन दिवसांतला स्वाईन फ्लूचा हा चौथा बळी आहे.

नेहरू वसाहतीच्या 71 वर्षीय महिला कैलास इस्पितळात उपचार घेत होत्या. ५ जानेवारी रोजी त्यांना पुढील उपचारासाठी श्रीमहंत इस्पितळात दाखल करण्यात आले. 13 जानेवारी रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमहंत इस्पितळात स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर इतर दोन इस्पितळात प्रत्येक एक रुग्णावर उपचार सुरू आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहता प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहान केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत