उत्तराखंड: दरीत बस कोसळून 14 जणांचा मृत्यू तर 18 जण जखमी

 

रायगड माझा वृत्त 

लखनऊ/ देहरादून: उत्तराखंड ऋषिकेश-गंगोत्री हायवे वर उत्तराखंड परिवहन मंडळाची बस सूर्यधार जवळ 250 मीटर खोल दरीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी आहेत.

गुरुवारी सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी उत्तराखंड परिवहन मंडळाची बस ३१ प्रवाशांना घेऊन हरिद्वार साठी निघाली होती. त्यानंतर ती वाटेत सूर्यधार जवळ एका दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच टिहरीचे जिल्हाधिकारी सोनिका आणि पुलिस अधीक्षक योगेंद्र सिंह हे घटनास्थळी रवाना झाले.

उत्तराखंडचे राज्यपाल डाॅ. कृष्णकांत पाल आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत