उत्तर प्रदेशमध्ये फटाके व्यावसायिकाच्या घरी भीषण स्फोट, 10 जणांचा जागीच मृत्यू

लखनौ : रायगड माझा ऑनलाईन 

उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यात एका फटाके व्यावसायिकाच्या घरात भीष्ण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच संपूर्ण घरही उध्वस्त झाले आहे. या दुर्घटनेत काही लोक घराच्या ढिगार्‍याखाली गाडले गेल्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. एनडीआरफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भदोही-बाबतपूर मार्गावर रोटहां गावात इरफान मंसूरी खान या व्यक्तीचे फटाके निर्मिती आण विक्रीचा व्यवसाय होता. त्याने आपल्या घरातच काही फटाके ठेवले होते. या घरात भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की घरातील सामानांच्या चिंधड्या होऊन ते 400 मीटर दूर  फेकल्या गेल्या. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची महिती दिली. ढिगार्‍याखालून 10 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत