उत्तर प्रदेशात भाजप आमदाराची गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेश : रायगड माझा वृत्त 

भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबीक वादातून एका भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत या खुनाचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील रुपईडीहा भागातील बाबागंज गावात ३१ जुलैच्या रात्री विरेंद्र मिश्रा या भाजप नेत्याची हत्या करण्यात आली. ही हत्या भाजप नेत्याच्या पुतण्यानेच केल्याचे समोर आले आहे. पुतण्या प्रवेश कुमार याने पैशांच्या देवाण-घेवाणीच्या प्रकरणातून काकाची हत्या केल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

योगी आदित्यनाथ यांचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वीही भाजप नेत्यांची हत्या करण्यात आली होती. ग्रेटर नोएडा येथील भाजप नेते शिव कुमार यादव यांची तर बांदा जिल्ह्यातील भाजप नेते अवधेश तिवारी यांचे भाऊ राकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत