उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारपेक्षाही केरळमधील पूरग्रस्तांना नीता अंबानींनी केली जास्त मदत

रायगड माझा वृत्त 

मुंबई- ८ ऑगस्टपासून केरळमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला असून दरम्यान केंद्र सरकारने केरळमध्ये नैसर्गिक संकट आल्याचे जाहीर केले आहे. अनेक सेवाभावी संस्था पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी ५० कोटी रुपयांची साधनसामुग्री आणि २१ कोटी रुपये केरळ मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्‍याची घोषणा रिलायन्स फाउंडेशनच्या (आरएफ) अध्यक्ष नीता अंबानी यांनी केली आहे. केरळमधील पूरग्रस्तांसाठी नीता अंबानी यांनी केलेली ही मदत उत्तर प्रदेश आणि महाराष्‍ट्र सरकारने दिलेल्या मदतीपेक्षा तिप्पट आहे.

 

केरळमधील पूरग्रस्तांसाठी मध्यप्रदेश सरकारने १० कोटी रुपये, उत्तर प्रदेशने १५ कोटी तर महाराष्ट्र सरकारने २० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ५ कोटी रुपयांची साधनसामुग्री पाठवणार असल्याचे तमिळनाडु सरकारने म्हटले आहे. जगभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. केरळला संयुक्त अरब अमीरातमधील भारतीय व्यावसायिकांनी १२.५ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. भारतीय वंशाचे व्यावसायिक एमए यूसुफ अली यांनी ५ कोटी, फातिमा हेल्थकेयर ग्रुपचे चेअरमन केपी हुसैन यांनी ५ कोटी आणि अब्जाधीश बीआर शेट्टी यांनी २ कोटी रुपयांची वैयक्तीक मदत जाहीर केली आहे.

याआधी पोप फ्रांसिस या आंतरराष्ट्रीय समुदायाने केरळला मदतीची घोषणा केली आहे. ‘वेटिकन न्यूज’नुसार, पोप फ्रांसिसने सेंट पीटर्स स्क्वेयरवर पूरग्रस्तांसाठी सामुहिक प्रार्थना केली. यूएईने केरळला ५ लाख मिलियन डॉलर (जवळपास ३४ कोटी) मदत देण्याची घोषणा केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.