उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये विषारी दारूमुळे 40 जणांचा मृत्यू

12 people killed in hooch tragedy in haridwar uttarakhand | उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये विषारी दारूमुळे 40 जणांचा मृत्यू

हरिद्वार : रायगड माझा वृत्त

उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 12 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (8 फेब्रुवारी) भगवानपूर येथील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे विषारी दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. याआधी कुशीनगरमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आतापर्यंत एकूण 40 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे.

हरिद्वारचे जिल्हाधिकारी दीपक रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारूमुळे आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये विषारी दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून 8 जणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर उपचारासाठी रुग्णालयात असणाऱ्या व्यक्तींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत