उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचे कारण काय होते, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

काही दिवसांपूर्वीच साताऱ्यात पार पडलेल्या महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या राज्य सरकारने उभारलेल्या “महाराष्ट्र दौलत” या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे हे एकाच व्यासपीठावर उपस्थितीत होते. यावेळी, ‘तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी जे निर्णय घेतले ते आजपर्यंत कुणीही घेतले नाही. घोषणा भरपूर झाल्या, पण अंमलबजावणी झाली नाही. तुम्ही निर्णय घेतले आणि अंमलबजावणी केली’ अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली होती. तसंच ‘महिन्याभरात माझं लग्न आहे, काही महिन्यांनी या सगळ्याचं लग्न आहे. निवडणूक आहे, अक्षता टाका, त्यावेळी संपल्या म्हणू नका’ अशी टोलेबाजीही उदयनराजेंनी केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत