उदयनराजे भोसले-रामराजे नाईक निंबाळकर वादाचे पनवेल मध्ये पडसाद

उदयनराजे भोसले यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या रामराजे नाईक निंबाळकर यांचा पनवेल येथे राजे प्रतिष्ठानने केला जाहीर निषेध

पनवेल : साहिल रेळेकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्याचा पनवेलमध्ये राजे प्रतिष्ठानच्या मुंबई, नवी मुंबई, कर्जत, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, रायगड आणि पनवेल तालुक्याच्यावतीने रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शांततेच्या मार्गाने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू बबन मरे, मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत उर्फ मामा धडके, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, ठाणे जिल्हाध्यक्ष नवनाथ अहिरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत उर्फ मामा धडके यांनी बोलताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, ज्या पद्धतीने भोलेनाथ शिव यांचे पुत्र श्री गणेश हेही दैवत आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज हे आमचे दैवत आहे, आणि जर कोण आमच्या दैवताबाबत काही बोलत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देऊ. उदयनराजे भोसले महाराज यांच्याबाबत ज्या रामराजे नाईक निंबाळकरांनी बेताल वक्तव्य केलं आहे, त्यांनी सर्वप्रथम माफी मागितली पाहिजे, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा यावेळी राजे प्रतिष्ठान तर्फे देण्यात आला. उदयनराजे यांच्या आदेशावरून राजे प्रतिष्ठान शांत आहे, मात्र महाराजांनी ज्या दिवशी आदेश दिला त्यादिवशी राजे प्रतिष्ठान आपली ताकद दाखवेल असे देखील यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे रामराजेंनी उदयनराजे भोसले महाराज यांची माफी मागितली पाहिजे, फलटणचे आमदार रामराजे निंबाळकर यांनी केलेल्या बालिश वक्तव्याचा आम्ही राजे प्रतिष्ठान जाहीर निषेध करतो, आणि येत्या विधानसभेत छत्रपतींचे मावळे फलटणच्या आमदारांना त्यांची जागा दाखविणार आहेत. त्यामुळे पुन्हा ते विधानसभेवर येतील याची खात्री ते स्वतः सुद्धा याठिकाणी देऊ शकणार नाहीत. ज्यांना छत्रपतींबद्दल आणि सातारच्या गादीबद्दल अभ्यास नाही त्यांनी अशी बालिश वृत्तीची विधाने केली आहेत, यापुढे राजे प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा खरपूस समाचार घेतला जाईल असा इशारा यावेळी श्री.धडके यांनी राजे प्रतिष्ठानच्यावतीने दिला आहे.

यावेळी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी बोलताना सांगितले की, रामराजे यांना रायगड जिल्ह्यामध्ये फिरू दिले जाणार नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत