उद्धवना खरेच आमची गरज आहे का?

मुंबई : रायगड माझा 

आम्ही शिवसेनेच्या पायाचे दगड आहोत. आमच्यात आजही तलवार उचलण्याची ताकद आहे. आम्हाला पदे नकोत. आम्ही निवृत्तीवेतन मागत नाही, सन्मान मिळावा हीच इच्छा आहे. पण उध्दवजींना खरेच आमची गरज आहे का, असा थेट सवाल करीत शनिवारी ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढीसाठी आंदोलन करणार्‍या ज्येष्ठ शिवसैनिकांचे शनिवारी दादर येथील देवराज सभागृहात संमेलन संपन्न झाले. मनोहर जोशी यांनी आपल्या भाषणात, ज्येष्ठ शिवसैनिकांचा ग्रुप का तयार झाला, असा थेट सवाल केला.

शेयर करा

One thought on “उद्धवना खरेच आमची गरज आहे का?

  1. Its a real fact..
    खरे बाळासहेबांचे शिवसैनिक/ खरे भक्त खुप मागे पडले आहेत..
    ज्यांच्या जिवावर शिवसेना उभी राहिली त्यानां पक्ष्यात काडीचीही किमत राहिली नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत