उद्धव ठाकरेंची 5 वाजता पत्रकार परिषद, सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता

मुंबई : रायगड माझा 

पालघर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मातोश्रीवर तातडीने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी भाजपसोबत राहायचे की नाही यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतात असे सांगितले जात आहे. परंतु आतापर्यतचे शिवसेनेचे धोरण पाहता शिवसेना पुन्हा एकदा तह करू शकते असेहो बोलले जाते .

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत