उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली!

मुंबई : रायगड माझा

मराठा आरक्षणाबाबत काल  उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना भाजपसोबत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सेनेनं नेमकी काय भूमिका घ्यावी, यावर या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेले सेनेचेच आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. पण उद्धव ठाकरे यांनी जाधवांना भेटण्यास नकार दिला. त्यानंतर मातोश्रीवर पूर्व नियोजित बैठक पार पडली.

 

शेयर करा

One thought on “उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली!

  1. उद्धव ठाकरेंनी योग्य केले . बरेच दिवस नाराज़ आमदार शिवसेना सोडतील अशी अफवा होती . उद्धवजींच्या या निर्णयाने परिस्थिति आटोक्यात येईल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत