उद्धव ठाकरेंवरही ED चा दबाव?

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात ईडीचा मुद्दा सर्वाधिक गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने तडजोड केली असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला. 

काही जागांसाठी खळखळ करत बसण्यापेक्षा राज्याचं हित पाहणं महत्त्वाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  या प्रकरणात शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्याचा राष्ट्रवादीला फायदाच झाल्याचं बोललं गेलं. पण त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामागेही ईडीचा ससेमिरा लागू शकतो, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत आता शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सांभाळून घ्या अशी विनंती केली होती त्यामुळे तडजोड केली असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘यावेळी शिवसेनेला सर्वात कमी जागा मिळाल्यात हे खरं आहे. मात्र त्याच वेळी हेही लक्षात घ्या की यावेळी शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडणून येणार आहेत,’ असा दावा उद्धव यांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत