उद्धव यांनी केला शिवसैनिकांचा अपेक्षाभंग

45 मिनिटांच्या भाषणात कोणतीही ठोस भूमिका नाही

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात काय बोलतील याविषयी प्रचंड उत्सुकता होती. मीडियाने हा विषय बराच हाइपदेखील केला होता पण प्रत्यक्ष 45 मिनिटांच्या भाषणात उद्धव यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.शिवसेनेत असूनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विशेष सख्य राखणारे खासदार संजय राऊत आणि पगारापेक्षा जास्त बोलणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपाला आणि नरेंद्र मोदींना गाडून टाकण्याची भाषा केली. भाजपावर हे दोघेही अक्षरशा तुटून पडले.त्यांनी भाजपाची लाज काढली आता या दोघांनी एवढे वातावरण तापवले म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे नेहले पे देहला करीत भाजपला दणके देतील असे वाटले होते पण घडले उलटेच.

पाच राज्यांच्या निवडणुकीतील प्रचारात भाजपच्या बाजूने उतरण्याची तयारी ठाकरे यांनी दर्शवली.मोदींनी महागाई कमी करण्याची व पेट्रोलचे दर कमी करण्याची हमी दिली तर त्यांच्यासाठी मी न बोलविता प्रचाराला जाईल असे सांगून उद्धव यांनी काय मिळवले हा प्रश्न शिवसैनिकांना देखील पडला असणार. युती तोडण्याचा निर्णय मी मागे घेतला आहे एवढा एकच ओझरता उल्लेख त्यांनी केला मात्र आगामी सहा महिन्यांवर असलेली लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढणार असे त्यांनी आजच्या मेळाव्यात कुठेही म्हटले नाही.लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा दसरा मेळावा असणार स्वबळाची भाषा करून ठाकरे शिवसैनिकांना नवी उमेद देतील अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली. लोकसभा निवडणुकीत युती करण्याची शक्यता उद्धव यांनी आपल्या बाजूनेही कायम ठेवली असल्याचे संकेत त्यांच्या आजच्या भाषणाने मिळाले.

शिवसेनेने नेहमीच भावनिक राजकारण केले आहे राम मंदिराच्या मुद्द्यावरही शिवसेना भावनिक ते पलीकडे जाणार नाही हे उद्धव यांच्या भाषण यावरून स्पष्ट झाले अयोध्या राम मंदिर बांधणार म्हणजे काय करणार या विषयी कुठलीही वाचता त्यांच्या भाषणात नव्हती राम मंदिर उभारणीच्या कोणताही कार्यक्रम त्यांनी शिवसैनिकांना दिला नाही फक्त स्वतः 25 नोव्हेंबरला करणार असल्याचे जाहीर केले. निवडणूक महापालिकेची असो की लोकसभ,विधानसभेची त्यात हिंदू-मुस्लीम,गुजराती- मराठी महाराष्ट्र-कर्नाटक अशा वादावर टोकाचे भाष्य करायचे आणि मराठी माणसांची मते मिळवायची ही शिवसेनेची नेहमीची पद्धत राहिलेली आहे. आज त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्याला हात घालताना पुन्हा तेच केले. अयोध्येतील वादग्रस्त वास्तु पाडण्यात आली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचे श्रेय घेणारे अफलातून विधान केले होते बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे असे भावनिक वाक्य वापरून त्यांनी अयोध्येतील वास्तु पाडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता उद्धव देखील त्याच मार्गाने जाऊ पाहत आहेत.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील शिवसेनासैनीकांची गर्दी दरवर्षी ओसरत असताना यावर्षी मात्र तुलनेने चांगली गर्दी जमविण्यात शिवसेनेला यश आल्याचे दिसून येत होते. शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह होता, नेहमीच्या जोरदार घोषणा होत्या पण पक्षप्रमुखांच्या भाषणांमध्ये हवा तसा दम नव्हता. यानिमित्ताने बाळासाहेबांची आठवण झाली.त्यांच्या भाषणाला सामान्य शिवसैनिक प्रचंड गर्दी करत असत. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असत. हे प्रश्न घेऊन आलेल्या शिवसैनिकांची नेमकी नाडी बाळासाहेब ओळखत असत आणि त्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या भाषणातून आपसूकच मिळत असत. प्रश्नांचे काहूर मनात घेऊन आलेला शिवसैनिक त्यांची उत्तरे मिळाल्याचे समाधान घेऊन घरी जात असे. उद्धव यांच्या भाषणासाठी आलेल्या शिवसैनिकांना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे गुरुवारी मिळाली नाहीत. उलट त्यांच्या मनाचा गोंधळ वाढला असणार असे जाणवत राहिले. आजच्या सभेची मोठी जाहिरातबाजी शिवसेनेने केली होती. “आता ताकत दाखवणारच” असे मोठमोठ्या होर्डिंग्जवर झळकले होते. शिवसैनिकांनी मोठी गर्दी करून त्यांची तक टाकत तर दाखवली पण उद्धव ठाकरेंची ताकद आता दिसेल मग दिसेल,आता दिसेल मग दिसेल याची वाट पाहत पाहत 45 मिनिटांचे त्यांचे भाषण संपले. पावसाने ठाकरेंची सभा सुखरूप होऊ दिली अन सभा संपताच दोन मिनिटातच जोरदार पावसाची हजेरी लागली. पावसाने ठाकरे यांच्या सभेवर पाणी फिरू दिले नाही पण मोठ्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांच्या अपेक्षांवर ठाकरे यांच्या भाषणाने पाणी फिरले असे मात्र वाटत राहिले.

शेयर करा

One thought on “उद्धव यांनी केला शिवसैनिकांचा अपेक्षाभंग

  1. युतिचे क़ाय करायचे ते नंतर बघू, म्हणजे पुन्हा युति करणार असेच असावे, पण भाजपा सरकारचे काम हे नक्कीच पारदर्शक आहे,कारण माघील चार वर्षात कोणत्याही मन्त्रयांन वर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, विशेष म्हणजे दहशदवादी हल्ले आपण या चार वर्षात महाराष्ट्र मधे कुठेच झालेले नाहीत,तेव्हा पुन्हा एक चान्स या सरकारला देने गरजेचे आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत