उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या कसं आहे वेळापत्रक

रायगड माझा ऑनलाईन | मुंबई

Image may contain: 6 people, crowd and trainमध्य व हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर विविध कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेवरून धावणा-या लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत, तर हार्बर मार्गावरील काही रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव दरम्यान दुरुस्तीचे काम होणार आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे धीम्या मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत दुरुस्तीचे काम हाती घेतले असून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.१४ या वेळेत कल्याण आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून सोडण्यात येणार आहेत. ठाणे, दिवा, डोंबिवली या स्थानकांवर लोकल थांबतील. तर ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांवर अप धिम्या मार्गावर रेल्वे गाडय़ा थांबणार नाहीत. तर हार्बर मार्गावर सीएसटी, चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान ११.४० ते ४.४० याकालावधीत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

त्यामुळे सीएसटी-चुनाभट्टी-वांद्रे स्थानकादरम्यान लोकल बंद असतील. पनवेल-कुर्ला स्थानकादरम्यान विशेष लोकल कुर्ला फलाट क्रमांक ८ वरुन चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकमुळे या मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन व पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ-गोरेगाव अप व डाईन जलद मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

एलफिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर १२ मीटर लांब स्टीलचे गर्डर टाकण्याचे ४ मार्चच्या रात्री ९.३० वाजता सुरू करण्यात येणार असून ५ मार्च पहाटे ६ वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. या कालावधीत डाऊन जलद मार्गावरील लोकल चर्चगेट, मुंबई सेंट्रल ते माहीमपर्यंत चालवण्यात येतील. महालक्ष्मी, एलफिन्स्टन व माटुंगा स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. लोअर परळ व माहीम येथे फलाटाच्या लांबीमुळे दोन वेळा थांबवण्यात येतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत