उनाड गुरांना वाचवताना बसचा घुसली रस्त्यालगतच्या नाल्यात

बोर्ली मांडला:-अमूलकुमार जैन 
उनाड गुरांना वाचवताना बसचा घुसली रस्त्यालगतच्या नाल्यात
मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील रामवाडी पासूनहाकेच्या अंतरावर रस्त्यावर बसलेल्या उनाड गुरांना वाचवताना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा टायर रस्त्यावरून घसरून रस्त्यालगत असलेल्या नाल्यात गेली.मात्र या अपघातात एका प्रवाशास मुका मार बसला आहे.
मुरूड आगारातील एसटी बस क्रमांक एम एच21/बीएल-2473 ही मुंबई येथून मुरूड येथे चालक जी.डी.शेख हे काल दिं.8 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजता घेऊन निघाले होते. ही बस बोर्ली ग्राम पंचायत हद्दीतील रामवाडी येथील विनंती थांब्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तुकाराम कमाने यांच्या श्री समर्थ हॉटेल नजिक पहाटे साडे चार च्या सुमारास  असता ,रस्त्यावर बसलेल्या उनाड गुरांना वाचवताना सदर बस ही रस्त्यालगत असलेल्या नाल्यात जाऊन गेली.या अपघातात एका प्रवासास मुका मार लागला असल्याचे मुरूड आगार प्रमुख युवराज कदम यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत