उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

वांगणी : अरुण बैकर 

राज्य शासनाच्या उन्नत शेती -समृद्ध शेतकरी या संकल्पने नुसार  शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी  २४ मे ते ७ जून हा उन्नत शेती पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. ठाणे आणि रायगड या  शेतीप्रधान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या योजने अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे  ठाणे जिल्ह्यातील वांगणी  येथे आयोजन करण्यात आले. 

 

उन्नत शेती समृद्ध शेतकरी” या संकल्पतेने शेती आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र शासन कृषि विभागा तर्फे  हा उपक्रम राबविला जात आहे.  पाउस सुरु होण्याचा काळ असल्यामुळे तसेच शेतीची भाजणी, नांगरणी , खते, बियाने याची तयारी शेतकरी करत असतात. त्या अनुषंगाने  तालुका कृषि अधिकारी उल्हासनगर ठाणे यांचा मार्फ़त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेती बीज रोपण प्रक्रिया, किटकनाशक फवारणी या संबंधी माहिती देण्यात आली. तालुका कृषि अधिकारी .विजय पाटिल यांनी शासनामार्फ़त पुरावाल्या जाणाऱ्या सोयी, आर्थिक अनुदान याबबताची माहिती दिली.
किटकनाशक तज्ञ रेंगड़े यांनी कीटकनाशक फवारणी कशी करावी, फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे कृषि अधिकारी खेड़ेकर यांनी पीक बियाने पेरणी याबाबत मार्गदर्शन केले.  कृषि आयुक्तालय पुणे चे संचालक श्री. डेरे यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यांचे निवारण केले त्याच प्रमाणे सेंद्रिय शेती करून जास्त प्रमाणात नफ़ा कसा कमावता येईल याचे त्यांना मार्गदर्शनही केले. या कार्यक्रमासाठी कृषी सेवक गंगावणे यांनी विशेष मेहनत घेतली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत