उन्हात होरपळलेल्या जिवांना उल्हास नदीचा आधार

उल्हासनदीत पोहण्यासाठी पर्यटक, स्थानिकांची झुंबड

नेरळ : कांता हाबळे

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वंत्र जनजीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे अशा होरपळलेल्यानी आता उल्हास नदीचा आधार मिळत असून पर्यटक व स्थानिक नागरिकांनी उल्हास नदीत पोहण्यासाठी मोठी गर्दी करून पोहण्याचा आनंद घेताना पहायला मिळत आहेत. 
गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होत आहे. सकाळपासूनच कडक उन पडत असल्याने वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांचा चांगल्याच जाणवत आहे. गेल्या वर्षींच्या तुलनेत यंदा सुर्य जास्तच आग ओकू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरीभागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा बसत असल्याने त्याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
यापासून सुटका करण्यासाठी नागरिक उल्हास नदीचा आधार घेताना दिसत आहेत. नेरळ परिसरातील फार्महाउसवर येणारे पर्यटक व स्थानिक नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी उन्हास नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत. थोडा वेळा का होईना थंडा थंडा कुल कुल होताना दिसत आहेत.
ग्रामीण भागातही उष्णतेचा परिणाम : 
जिल्हयाच्या ग्रामीण भागातही प्रचंड उष्णतेने नागरिकांची काहिली होत असून शेताऐवजी ग्रामस्थ घरीच थांबणे पसंत करत आहेत. उन्हाचे दिवस असल्याने जनावरे केवळ पाणी पिण्यासाठीच सोडली जातात. त्यामुळे उनेकदा उन्हाच्या उष्णतेपासून बचाव करण्याठी जनावरे पाण्यामध्ये डुंबण्यासाठी जादा वेळ घालवत आहेत. तसेच ग्रामीण भागातील नदयांमध्ये पोहण्यासाठी मुलांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.  
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत