उरणमध्ये ऑईल टँकरने तरुणाला चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू

उरणमध्ये टँकरचा एक भीषण अपघात झाला आहे आणि यात एका तरुणाने आपला जीव गमावला आहे.

रायगड माझा वृत्त | उरण

डोक्यावरून गेला ऑईल टँकर, तरुणाचा जागीच मृत्यू

उरणमध्ये टँकरचा एक भीषण अपघात झाला आहे आणि यात एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. उरण तालुक्यातील भोम गावातीव रहिवासी असलेल्या एका तरूणाचा या अपघातात जीव गेला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑईल टँकरच्या खाली डोकं चिरडून या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी हा अपघात झाला आहे.

ऋषण पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी दुपारी जेएनपीटी बंदराजवळ गणेश बन्जो प्रकल्पाच्या गेटसमोर हा अपघात घडला आहे. ऋषण या गेटसमोरून जात असताना ते खाली पडले आणि काही घडताच तिथून जाणारा ऑईल टँकर त्यांच्या डोक्यावरून गेला. या घटनेनंतर टँकर चालकाने तिथून पळ काळला. स्थानिकांनी तात्काळ ऋषणला जवळच्या रुग्णालया त दाखल केलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नावा-शिवा पोलीस ठाण्यात अपघातग्रस्त टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिकांच्या मदतीने टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या टँकर चालकाचा शोध घेत आहे. खरंतर ऋषण पाटील हा पनवेलला राहणारा आहे. पण मुळचा तो उरणचा आहे. कामानिमित्त तो जेएनपीटी बंदराकडे गेला होता. आणि तिथेच या भीषण अपघातात त्याला मृत्यूने कवटाळलं.

ऋषण याच्या अशा अकाली जाण्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. ऋषण पाटील त्यांच्या कुटुंबियांसोबत पनवेलमध्ये राहत होता. तो त्याच्या कामानिमित्त उरणला गेला होता. पण तिथे त्याचा अपघात झाला आणि आज तो आपल्यात नाही आहे याचा त्याच्या कुटुंबियांना विश्वासच नाही बसत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत