उरण मधल्या वेअर हाउसमध्ये रसायनांचा साठा, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश

उरण : विरेश मोडखरकर

उरणमधील एका वेअर हाउसला रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. 

वेअर हाउसमध्ये रसायनांचा साठा असल्याने अग्निशमन दलाचे अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. नवीन पनवेल, कळंबोली, उलवे, जेएनपीटी आणि ओएनजीसी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, अशी माहिती सिडकोच्या अग्निशमन दलाचे प्रमुख विजय राणे यांनी दिली.

रसायनांचा मोठा साठा असल्यामुळे अगीवर नियंत्रण मिळवणं अवघड जातंय. यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या आणखी गाड्या मागवण्यात आल्या आहेत. वाशी, नेरूळ आणि सीबीडी येथील गाड्या येत आहेत, असं राणे यांनी सांगितलं. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत